शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री आवास’ला प्राधान्य द्या-आशिष ढवळे : २५० घरांना कर्जसंलग्न अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:08 IST

कोल्हापूर : शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला प्राधान्य द्या, व्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे १५ दिवसांच्या आत काढून तेथे पार्किंगची सुविधा करून द्या, अशा सूचना

ठळक मुद्देप्रशासकीय इमारतीचा ६४ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार. केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ९ कोटी ९० लाखांचा प्रस्ताव.‘सेफ सिटी’अंतर्गत १२९ कॅमेरे.

कोल्हापूर : शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला प्राधान्य द्या, व्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे १५ दिवसांच्या आत काढून तेथे पार्किंगची सुविधा करून द्या, अशा सूचना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाºयांना दिल्या. सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सायंकाळी ढवळे यांनी महापालिकेच्या प्रकल्प विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना ढवळे यांनी सांगितले की, एक वर्षाचा काळ काम करण्यास मिळणार असल्याने प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि नवीन प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त निधी सरकारच्या पातळीवर मिळविणे या कामांना प्राधान्य देत आहोत. शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृह सुधारणेचा दुसरा टप्पा, सेफ सिटी दुसरा टप्पा, कोंबडी बाजार व्यापारी संकुल, आदी प्रकल्पांवर चर्चा केली. या सर्व कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेथे राजकीय ताकद वापरून काही कामे करायची आहेत तेही सांगा. आमदार अमल महाडिक व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून ती पूर्ण केली जातील, असे अधिकाºयांना सांगितले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वैयक्तिक मालकीच्या प्लॉटवर बांधायच्या घरांसाठी १५० प्रस्ताव आले आहेत. त्यांपैकी १०० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पुढील चार महिन्यांत सहा लाख रुपयांचे कर्जसंलग्न अनुदान वाटप करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. खासगी विकसकामार्फत विकसित करायच्या २५० घरांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याच्या कामाचीही सुरुवात लवकरात लवकर करा. तसेच कदमवाडी, बोंद्रेनगर येथील झोपडपट्टीतील १४२ घरे विकसित करण्याचे काम हाती घ्या, अशा सूचना दिल्याचे ढवळे यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक शेखर कुसाळे, विजय खाडे उपस्थित होते.गाडीअड्डा अतिक्रमण १५ दिवसांत हटविणारव्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाकरिता आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण १५ दिवसांत हटविण्यात येईल. त्या ठिकाणी गेट बसवून वॉचमन नेमावा; तसेच पे अ‍ॅँड पार्क तत्त्वावर तात्पुरता वाहनतळ सुरू केला जाईल. अधिकृत गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाईल. मात्र अतिक्रमण हटविले जाईल, असे ढवळे यांनी सांगितले.सरस्वती चित्रमंदिरसमोर पार्किंग सोयअंबाबाई आराखड्यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. दर्शन मंडपावर नंतर निर्णय घेतला जाईल. सरस्वती चित्रमंदिरासमोरील वाहनतळ सुविधा विकसित केली जाणार आहे. तेथील ४५ गाळेधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.